मनोरंजन

AAI KUTE KAY KARTE| ‘कभी खुशी कभी गम’ म्हणत कलाकारांनी शेअर केला रील…

Published by : Lokshahi News

स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte) मालिका रोज नवीन वळण घेत आहे. मालिकेत गोंधळ सुरू असला तरी कलाकार ऑफस्क्रीन (offscreen) मात्र धमाल करतात. आई कुठे काय करते सेटवरच्या गमती-जमती सोशल मीडियावर शेअर करत आहेत.असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. प्रेक्षकांची लाडकी संजनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मजेदार रील (Reel)शेअर केलाय. या रिलमध्ये संजना आणि अरुंधती सोबतच अनेक कलाकार 'कभी खुशी कभी गम'हे गाणं गाताना दिसत आहेत.

अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटानंतर नंतर संजनाला वेध लागले ते लग्नाचे. गेली कित्येक वर्ष ती ज्या दिवसाची वाट पहात होती तो दिवस आता जवळ आलाय. 30 ऑगस्ट ही या दोघांच्या लग्नाची तारीख पक्की झाली. मात्र आगामी भागात, संजना अनिरुद्धसोबत तिच्या लग्नासाठी तयार होईल. अनिरुद्ध विवाहाच्या दिवशी गायब होईल, त्यामुळे संजनाला काळजी वाटेल. संजना अरुंधतीला फोन करून त्याच्याबद्दल विचारेल. तिने आणि तिच्या कुटुंबाने तिचे आयुष्य नष्ट केले असे म्हणेल, त्यावर अरुंधती संजनाला फटकारेल. अरुंधती संजनाला उत्तर देईल की, तिचे आयुष्य कोणीही नष्ट केले नाही. अरुंधती संजनाला इशारा देईल आणि म्हणाली की जर तिने कधी तिच्या कुटुंबाकडे लक्ष दिले. तर ती तिला धडा शिकवेल.

आता अनिरुद्ध लग्नाच्या दिवशी उपस्थित राहणार की नाही? हे पाहणे मनोरंजक असेल. संजनाचे देशमुखांच्या घरात गृहप्रवेश करण्याचं स्वप्न पूर्ण होईल का ? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मालिकेत पुढे काय घडेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

लग्नामध्ये संजना नटण्याची सर्व हौस भागवून घेणार आहे. गुलाबी रंगाच्या साडीतला तिचा ब्रायडल लूक सध्या व्हायरल होतोय. आई कुठे काय करते मालिकेतल्या संजनाच्या लूकची नेहमीच चर्चा राहिली आहे. संजनाचं स्टाइल तिच्या चाहत्या फॉलो करताना दिसतात. संजनाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेला देखिल फॅशनचे नवनवे ट्रेण्ड ट्राय करायला आवडतात.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती