धारावीच्या झोपडपट्टीत राहणारी १४ वर्षीय मुलगी ब्युटी ब्रॅन्डचा चेहरा बनली आहे. या मुलीचे नाव मलीशा खारवा असे आहे. या मुलीची लक्झरी ब्युटी ब्रॅन्ड असलेल्या फॉरेस्ट इसेंशियल्सच्या नवीन कॅम्पेनसाठी ब्रॅन्ड एम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन हा एका गाण्याचं शूटिंग करण्यासाठी मुंबईत आला होता. यावेळी त्याने मलीशाला शोधलं. त्यानंतर त्याने मलिशाचे इन्टाग्रामवर अकाऊंट ओपन केलं. या मुलीने याच्याआधी एका 'लिव्ह युअर फेअरीटेल' नावाच्या शॉर्टफिल्ममध्ये काम केलं आहे.
मलिशाचा एक व्हिडिओ फॉरेस्ट इसेंशियल्सनं शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे.