मनोरंजन

भारतात बॅन झालेले पण, जगभरात गाजलेले ६ भारतीय चित्रपट

भारतात बॅन झालेले चित्रपट पण आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले चित्रपट

Published by : Rajshree Shilare

आपल्या देशात कुठल्याही चित्रपट रिलीज होण्याआधी त्याला 'सेंसर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन' (Censor Board of Film Certification) यांच्या परीक्षेत पास व्हावं लागत. सेंसर बोर्ड तो चित्रपट बघितल्यावर निर्णय देते की, तो भारतात प्रदर्शित करायचा की नाही आणि कुठला भाग दाखवला जाणार कुठला भाग दाखविण्यात नाही हे देखील 'सेंसर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन' ठरवत असत.

सेन्सर बोर्ड फक्त सिन्सवरच नाही तर कधी कधी संपूर्ण चित्रपटावरच बॅन लावते.पण असे चित्रपट आपल्याच देशात रिलीज होण्याकरिता खूप वाट पहावी लागते. त्यापैकी काही चित्रपट असे देखील असतात ज्या चित्रपटांनी कित्येक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत.

Peddlers

Peddlers एक क्राईम थ्रिलर आहे. जो २०१३ साली रिलीज होणार होता, पण हा चित्रपट अजूनही रिलीज झालेला नाही. पण या चित्रपटाची स्क्रीनिंग दक्षिणी फ्रांसच्या International Critics Week'मध्ये दाखविण्यात आली होती. या फिल्मला फेस्टिवल्समध्ये जरा जास्तच महत्व दिलं गेलं.

Hawa Aane De

'हवा आने दे' हा एक इंडो-फ्रेंच को-प्रोडक्शन चित्रपट आहे. सेन्सर बोर्डाने या चित्रपटावर कात्री चालविण्याचा प्रयत्न केला पण हा चित्रपट बनविणाऱ्यांनी त्यासाठी मान्यता दिली नाही. त्यामुळे हा चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झालेला नाही. पण याच चित्रपटाने कित्येक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे केले.

Jai Bhim Comrade

हा चित्रपट १९९७ च्या 'रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडा'वर आधारित असून या चित्रपटाच्या निर्मितीसाठी १४ वर्षांचा कालावधी लागला होता. २०११ मध्ये कोर्ट ट्रायल्सनंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.

Lipstick Under My Burkha

महिलांच्या जीवनावर आधारित 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' (Lipstick Under my burkha) हा चित्रपट रिलीज करण्यासाठी फिल्म मेकर्स ना खूप मेहनत करावी लागली होती. जानेवारी २०१७ मध्ये या चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर वादाच्या भोवऱ्यातून निघून जुलाई २०१७ मध्ये प्रदर्शित झाला.

Unfreedom

या चित्रपटात समलिंगी संबंधांचा मुद्दा उठविण्यात आला आहे. सेन्सर बोर्डाने मान्यता दिली नाही. त्यामुळे या चित्रपटाला आपल्या देशात नेहेमीकारिता बॅन करण्यात आला आहे. पण याचं चित्रपटाला 'Golden Reel Awards' मध्ये नॉमिनेट करण्यात आले होते.

Black Friday

फिल्ममेकर अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट १९९३ सालच्या मुंबई बॉम्ब ब्लास्टवर आधारित होता. या चित्रपटाच्या रिलीजवर तीन वर्षांपर्यंत बॅन लावण्यात आला होता. त्यानंतर हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित करण्यात आला.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण