छोट्या पडद्यावरील होम मिनिस्टर (Home Minister) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणारे आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांनी या कार्यक्रमाला खूप लोकप्रियता मिळवून दिली आहे. या कार्यक्रमाचा नवं पर्व हे 11 एप्रिलला सुरू झाले आहे. महत्वाचे असे आहे की, या पर्वाला महामिनिस्टर (Mahaminister) असे नाव देऊन हा कार्यक्रम दररोज सायंकाळी 6 ते 7 ला झी मराठी वाहिनीवर प्रसारित होतो. या पर्वात विजेयी होणाऱ्या महिलेला 11 लाखाची पैठणी (Paithani) दिली जाणार आहे. म्हणून हे पर्व विशेष आहे. आणि 11 लाखाच्या पैठणीची प्रचंड चर्चा होत आहे. त्यानंतर या टीकाही करण्यात आली होती. मात्र 11 लाखाच्या पैठणीमागचे सामाजिक दुष्टीकोन काय आहे स्पष्ट केले आहे.
नाशिकमधील (Nashik) पैठणीसाठी प्रसिद्ध असलेले येवला (Yeola) हे ठिकाण आहे. 11 लाखाची ही पैठणी ही येवल्यात तयार करण्यात आली आहे. दिव्यांग कलाकारांनी ही 11 लाखाची पैठणी तयार केली आहे. ऐकता आणि बोलता न येणाऱ्या या कलाकारांनी ही पैठणी तयार केली. या पैठणीला सोन्याची जर आणि हिऱ्यांनी ती पैठणी उठून दिसत आहे. दिव्यांग कलाकृतीमुळे या पैठणी तेज आणखी खूळून दिसत आहे. या सर्व उपक्रमाबद्दलची माहिती झी मराठी वाहिनीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.हा व्हिडिओ पाहताच प्रंचड प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही संकल्पना सगळ्या आवडली असे कमेंट पाहायला मिळत आहेत.
हा व्हिडिओ दोन मिनिटांचा आहे. या व्हिडिओमध्ये (video) आपण पाहू शकतो की या कलाकारांची सुरू असलेली तयारी आणि लयबद्ध पद्धतीने सुरू असलेला मागचा तो आवाज. आणि त्यासोबत आदेश बांदेकराचे निवेदन. प्रेक्षकांना पडलेली 11 लाखाच्या पैठणीबद्दलची प्रश्नांची उत्तरे आदेश बांदेकरांनी त्याच्या निवेदनातून दिली आहेत. या व्हिडिओमधून पाहू शकतो की, चित्र रेखाण्यापासून ते विणकामापर्यंतचा प्रवास या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे.