मागील अनेक महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या खाद्य तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. मोदी सरकारने पाम तेलासह विविध खाद्यतेलावरील आयात शुल्कात प्रती टन 8000 (११२ डॉलर) रुपयांची कपात केल्याने सामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलाचे भाव प्रचंड वाढले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या वाढलेल्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारपेठेत पाहायला मिळत होता. मात्र, मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच खाद्यतेलाचे भाव सामान्य पातळीवर येईल, असा अंदाज आहे.