दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता.
हा भूकंप सकाळी ९.४५ वाजता ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा असून भूकंप अफगाणिस्तान – ताजिकिस्तान सीमा प्रदेशात झाला. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की दिल्ली, जम्मू काश्मीर आणि आजूबाजूचा परिसरात या भूकंपाचे धक्के जाणवले.