गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात पोलिसांनी तीन जणांकडून ३१३.२५ कोटी रुपयांचे हेरॉइन आणि मेथॅम्फेटामाइन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. हा जप्त केलेला अंमली पदार्थ पाकिस्तानमधून सागरी मार्गाने गुजरातमध्ये आणले जात होते. त्याची तस्करी केली जात होती. असे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दरम्यान दोन व्यक्तींकडून बुधवारी एका छाप्यात जप्त करण्यात आलेल्या एकूण ४७ पाकिटांमध्ये ४५ किलो हेरॉइन म्हणजेच २२५ कोटी रुपयांचे हेरॉइन असल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
तसेच पोलिसांनी मंगळवारी खंबालिया शहरामध्ये एका विश्रामगृहामधून महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात मुंब्रा येथे भाजी विक्रेता सज्जाद घोसी पोलिसांनी पकडले आणि त्याच्याकडून ११.४८३ किलो हेरॉइन आणि ६.१६८ किलो मेथाम्फेटामाइनची एकूण १९ पाकिटे ८८.२५ कोटी रुपये किमतीची जप्त केली. दरम्यान सलीम कारा आणि अली कारा या दोन भावांकडून अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती घोसीने पोलिसांना दिली. नंतर पोलिसांनी बुधवारी देवभूमी द्वारका जिल्ह्यातील सलाया या गावातील कारा बंधूंच्या घरावर छापा टाकून ४७ पाकिटे जप्त केली. त्या पाकिटांची चाचणी केली असता ४७ पाकिटांमध्ये २२५ कोटी किमतीचे ४५ किलो हेरॉइनचे असल्याचे सिद्ध झाले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.