India

मेहुल चोक्सीला जामीन मंजूर

Published by : Lokshahi News

पंजाब नॅशनल बँकेत गैरव्यवहार प्रकरणी परदेशात पळून गेलेल्या उद्योगपती मेहुल चोक्सीला डोमिनिका कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्याला जामीन मंजूर झाला आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याला डोमिनिकातून भारतात आणण्यासाठी विविध यंत्रणांचे पथक तिथे गेले होते. मात्र जवळपास एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर चोक्सी याला न घेताच परतले होते. आता कोर्टात ऑनलाइन सुनावणीवेळी मेहुल चोक्सी रुग्णालयातील बेडवर झोपलेल्या अवस्थेत हजर झाला होता. यावेळी कोर्टानं उपचारासाठी अँटिग्वाला जाण्याची परवानगी दिली आहे.मेहुलवर सध्या डोमिनिकाच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती