दिवाळी 2024

Diwali Padwa, Bali Pratipada 2024 Wishes: आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा आपल्या प्रियजनांना द्या दिवाळी पाडव्याच्या आणि बलिप्रतिपदेच्या "या" शुभेच्छा...

आश्विन अमावस्येला दीपावली सण साजरा केला जातो. यंदा २ नोव्हेंबरला बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरी केले जाणार आहे. या शुभ दिवशी आपल्या प्रियजनांना दिवाळी पाडव्यानिमित्त आणि बलिप्रतिपदा निमित्त द्या या मंगलमय शुभेच्छा...

Published by : Team Lokshahi

दिवाळी सणाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. आश्विन अमावस्येला दीपावली सण साजरा केला जातो. यंदा २ नोव्हेंबरला बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा साजरी केले जाणार आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा. पत्नीकडून पतीचे औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ असे या दिवसाचे महत्त्व आहे. बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. 'इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो', अशी प्रार्थना देवी चरणी केली जाते. या शुभ दिवशी आपल्या प्रियजनांना दिवाळी पाडव्यानिमित्त आणि बलिप्रतिपदा निमित्त द्या या मंगलमय शुभेच्छा...

बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभु ।

भविष्येन्द्रा सुराराते पूजेनंतर प्रतिगृह्यताम् ।।

आपुलकीच्या नात्यात मिसळू फराळाचा गोडवा,

सुख, समृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा,

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सुमुहूर्तावरी पाडव्याच्या एकात्मतेचे लेणे लेऊया,

भिन्न विभिन्न असलो तरी सर्व मनाने एक होऊया.

बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

नवा सुगंध नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,

स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे,

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज बलिप्रतिपदा, दिवाळीचा पाडवा,

राहो सदा नात्यात गोडवा...

बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

Mumbai Megablock News: भाऊबीजनिमित्त रविवारीचा मेगाब्लॉक रद्द

MNS Deepostav Raj Thackeray: ठाकरे गटाची आयोगाकडे तक्रार, कंदीलावर मनसेचे चिन्ह आणि पक्षाच नाव

सोलापुरात 6 नोव्हेंबरला राज ठाकरेंची प्रचारसभा

सोलापुरात 'या' दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीत सुधारणा; पहिला व्हिडिओ आला समोर; म्हणाले...