दिवाळी 2024

Vasubaras 2024 Wishes: गोमातेच्या पूजनाने साजरा करा वसुबारस, अन् आपल्या प्रियजनांचा द्या "या" मंगलमय शुभेच्छा!

दिवाळीच्या पहिल्या दिवसासह वसु बारस हा सण साजरा केला जाणार आहे. भारत हा देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. याच गोमातेला वंदन करुन आपल्या प्रियजनांचा द्या वसुबारसच्या या मंगलमय शुभेच्छा!

Published by : Team Lokshahi

हिंदू कॅलेंडरनुसार सोमवार , २८ ऑक्टोबर रोजी अश्विना किंवा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाचा बारावा दिवस म्हणजे वसु बारस. दिवाळीच्या पहिल्या दिवसासह वसु बारस हा सण साजरा केला जाणार आहे. भारत हा देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत असे मानले जाते.

म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. हिंदू संस्कृतीमध्ये ज्याप्रकारे इतर सणांना महत्त्व आहे त्याचप्रमाणे दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस या सणाला देखील महत्त्व आहे. हिंदू धर्मात गायीला माते म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्त्विक आहे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणे तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते. याच गोमातेला वंदन करुन आपल्या प्रियजनांचा द्या वसुबारसच्या या मंगलमय शुभेच्छा!

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला,

स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया,

नमस्कार त्या दिव्य गो देवतेला...

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

गायी आणि वासरांची,

सेवा आणि संरक्षण करा,

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना,

सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो..

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

गाय आणि वासरांच्या अंगी असणारी,

वात्सल्यता, उदारता प्रसन्नता आणि समृद्धी,

हे सर्व आपणास लाभो…

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन,

त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी,

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

14 उमेदवारांसह कॉंग्रेसची चौथी यादी जाहीर

Congress: 14 उमेदवारांसह कॉंग्रेसची चौथी यादी जाहीर

MNS: मनसेची सहावी यादी जाहीर, 32 उमेदवारांच्या नावांचा समावेश

Eknath Shinde Shivsena: शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

Pune Ujjwal Nikam: पुण्यात भाजपला मोठा धक्का! उज्ज्वल केसकरांचा स्वराज्य पक्षात प्रवेश