आज लक्ष्मीपूजन आहे आणि याचनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. दिवाळीचा सण सर्वात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सोळखंबी, चौखंबी, सभामंडप, नामदेव पायरी, ज्ञानेश्वर मंडपावर ही सजावट करण्यात आलेली आहे. या सजावटीसाठी पांढरी शेवंती, भगवा झेंडू तसेच पिवळा झेंडू, गुलाबी फुल, अश्तर, हिरवापाला , कमिनी, शेवंती या फुलांचा वापर करण्यात आला आहे. बीडचे विठ्ठल भक्त अर्जून हनुमान पिंगळे यांनी ही सेवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण केली आहे. या फुलांच्या सजावटीसाठी श्री फ्लॉअर्स पुणे यांचे सुमारे 25 कामगारांनी परिश्रम घेतले आहेत. या सजावटीमुळे संपुर्ण मंदिराचे रुप अगदी पालटून गेलं आहे.