दिवाळी 2024

Diwali 2024: दिवाळीत लक्ष्मीपूजनसाठी देवी समोर लावा पणतीपासून तयार केलेली सुंदर समई...

Published by : Team Lokshahi

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे अशातचं दिवाळी म्हटलं की हिंदू धर्मातील सर्वात उत्साहात साजरी केला जाणारा सण आहे. तसेच दिवाळी म्हटलं की सर्वत्र अंधकारावर प्रकाशाची ज्योत पेटवली जाते. निरनिराळ्या लाईट्स, दिवे, रांगोळी आणि दाराबाहेर पणत्यांची आरास अशाप्रकारे दिवाळी मोठ्या उत्साहाने आणि आंनदाच्या वातावरणात साजरी केली जाते. अशातच आता दिवाळी आली की लक्ष्मीपूजन देखील आलं तर मग यावेळी लक्ष्मी मातेची पूजा करताना समई लावली जाते. मात्र ही समई तुम्ही विकत न घेता तुमच्या घरात असलेल्या जुन्या लहान पणतींपासून देखील तुम्ही तयार करु शकता कशी ते जाणून घ्या...

समई तयार करण्यासाठी लागणारे साहित्य:

12 लहान पणती

एम - सील

लहान पाईप

रंग

फेव्हिकोल

समई तयार करण्याची कृती:

सर्वात आधी ज्या 12 लहान पणत्या आहेत त्यातील आधी एका पणतीला सहा पणत्या बाजूला गोलाकार एम - सीलने चिटकवा. यानंतर त्याचप्रमाणे उरलेल्या पाच पणत्या देखील एक पणती मधे आणि तिच्या भोवती चार पणत्या चिटकवा. यानंतर पहिल्या मोठा गोल असणाऱ्या पणतीच्या मध्यल्या पणतीत एक लहान पाईप चिटकवा आणि पणतीच्या खाली देखील मधल्या पणतीला एक पाईप चिटकवा. यानंतर पणतीच्या आतल्या भागात चिटकवलेल्या पाईपला लहान पणतींचा तयार केलेला गोल चिटकवा तसेच, शेवटी म्हणजे मोठ्या पणतीच्या गोलाकाराखाली असलेल्या पाईपला एक खोलगट वाटीप्रमाणे वस्तू चिटकवा जेणे करुन तयार केलेली समई उभी राहण्यास सोईस्कर जाईल. नंतर तयार केलेल्या कलाकृतीला सोनेरी रंगाने रंग द्या आणि पणत्यांच्या आतल्या भागाला लाल किंवा तुम्हाला आवडणारा रंग द्या आणि अखेरीस तयार झालेल्या समईमध्ये तेल आणि लहान वात करुन ती देवी समोर लावा.

Vanchit Bahujan Aaghadi कडून तिसरी यादी जाहीर

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीचा ब्लॅक ड्रेस लूक पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

Breaking NEWS | New Justice Statue In Supreme Court | न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली...

मोठी बातमी: न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली

Amit Shah to CM Shinde | मुख्यमंत्रीपद देताना त्याग केला आता... जागावाटप बैठकीत शाहांचं मोठं वक्तव्य