कल्पना नळसकर, नागपूर | आजकाल व्हॉट्सअप हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे ..आणि त्यात स्टेटस म्हटलं की विचारायलाच नको पण याच व्हॉट्सअप स्टेटसचा वाद चक्क लग्नाचा वरातीपर्यंत येऊन पोहोचल्याच चित्र नागपुरात पाहायला मिळालेला आहे.
व्हॉट्सअप स्टेटस वर ठेवलेल्या फोटो वरून झालेल्या वादात सहा जणांनी लग्नाच्या वरातीत थांबवून हवेत पिस्तुलाच्या दोन राऊंड फायर केले.हे सगळं थांबवण्यासाठी पुढे आलेल्या नवरदेवाच्या लहान भावाला चाकूने मारून जखमी केले आहे.ही घटना यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोहम्मद रफी चौकात घडलेली आहे.
आरोपी समीर खानचा लहान भाऊ याने व्हाट्सअप स्टेटस वर आरोपी समीर खानचा फोटो ठेवला होता ..त्यावर शहबाज ने कमेंट केले त्यानंतर आरोपी समीरने त्याला कॉल करून समजण्याचा प्रयत्न केला..पण त्याने लग्नाच्या वरातीत आहे असे सांगितले त्यामुळे या संतप्त आरोपीने आपल्या साथीदारांसह या वरातीला थांबवून शहाबाजचा शोध घेतला. यावेळी त्यांनी हवेर फायरीग केली ..त्यांना अडवलेला आलेल्या नवरदेवाच्या भावावरती चाकूने वार केला आणि नंतर तिथून फरार झाले पोलिसानी तीन तुकड्या तयार करून तब्बल चार तासात आरोपींना गजाआड केले आहे आणि पुढील तपास पोलिस करत आहेत.