सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर मुंडे यांनी पुन्हा आपल्या कामास सुरुवात केली होती. त्यानंतर आता पुन्हा धनंजय मुंडे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
"माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी" असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.