राज्यात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. विविध जिल्हात बेड्स, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन रूग्णांना वेळेवर मिळत नाहीये. यातच आता बीडमधली आरोग्य स्थिती आणखीनच खराब होताना दिसत आहे. यावर आता बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन लवकर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
येत्या दोन दिवसात बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल, अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच यासह इतर आरोग्य सुविधांच्या बाबतीतील देखील अडचणी दूर होतील, असं आश्वासन देखील धनंजय मुंडे यांनी दिलं आहं. बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दुसऱ्या लाटेत अधिक धोका वाढला असून बीडच्या जनतेनं प्रशासनास सहकार्य करावं, असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी जनतेला केलं आहे.
रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे कोरोनाग्रस्त नातेवाईकांची धावपळ होत आहे. काही दिवसांपुर्वी जिल्हा प्रशिक्षण केंद्राबाहेर नातेवाईकांनी गर्दी केली होती. बीडमध्ये 350 बेड वाढवले जाणार आहेत. त्याशिवाय लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटर पूर्ववत सुरू करण्यात आलं आहे.