Mumbai

देवगडच्या सुपुत्राला ‘राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवापदक’ जाहीर!

Published by : Lokshahi News

देवगड तालुक्यातील मिठबावचे सुपुत्र व मुंबई अग्निशमन दलातील उपप्रमुख अग्निशमन अधिकारी संजय यशवंत मांजरेकर याना अग्निशमन दलातील उत्कृष्ट सेवे बद्दल 'राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवापदक' जाहीर झाले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सदर पदक देऊन लवकरच त्यांना गौरविण्यात येणार आहे. मिठबाव उत्कटवाडी येथील संजय मांजरेकर यांनी १९८९ मध्ये मुंबई अग्निशमन दलात सहा. केंद्र अधिकारी म्हणून भायखळा येथून आपल्या सेवेचा प्रारंभ केला होता.

त्यानंतर विक्रोळी, भेंडीबाजार येथील केंद्रावर सेवा बजावत सध्या ते नाना चौक येथील अग्निशमन केंद्रावर डेप्युटी चीफ फायर ऑफिसर या पदावर कार्य करत आहेत. येत्या एप्रिल मध्ये सेवेची ३३ वर्ष पूर्ण करणाऱ्या मांजरेकर यांनी सेवाकालावधीमध्ये अनेक वेळा प्रशंसनीय काम केले आहे.

९१ सालची मुंबई दंगल, साखळी बाँब स्फोट, भेंडी बाजार इमारत दुर्घटना अशा मोठ्या प्रसंगात केलेल्या चांगल्या कार्याबद्दल त्यांना कमिशनर यानी रजत पदक देऊन सन्मानित केले होते. संजय मांजरेकर यांची उत्कृष्ट कार्यामुळे 'राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदका' साठी घोषणा झाल्याने सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news