आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटून दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्यांनी वाळू माफियांच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
'वाळू चोरीमध्ये पोलीस तसेच थेट महसूल अधिकाऱ्यांचा सहभाग' असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केलाय. तर ह्या सर्व प्रकारांतून मिळणाऱ्या पैशांच्या मोबदल्यात 'महसूल आणि पोलीस यंत्रणा वाळू चोरांना थेट संरक्षण देतात' असंही ते म्हणाले. ह्याबाबत विचारणा केल्यास 'यात पैसे कमवायचे नाहीत तर कशात कमवायचे?' असं अधिकारी म्हणतात असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना सल्ला:
'मुख्यमंत्र्यांनी वाळू माफियांबाबत व वाळी चोरीबाबत एक महत्तवाची बैठक घ्यावी. व चौकशीअंती जर वाळू चोरी सापडली तर पोलीस अधीक्षकाला निलंबित करण्याची भूमिका घ्या' असंही ते म्हणाले.
राधाकृष्ण विखे-पाटील यांचा आरोप:
'मनासारखी बदली मिळावी ह्याकरीता दिलेले पैसे वसूल करण्यासाठी अधिकारी वाळूमाफियांना हाताशी धरतात' असा आरोप विखे-पाटील यांनी केलाय.