लोकशाही न्यूज नेटवर्क
दिल्लीमधील घटनासत्र थांबायचे नावच घेत नाही आहेत. एकीकडे दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत, अशातच आता दिल्लीमध्ये औरंगजेब मागार्वरील इस्रायल दूतावासाजवळ स्फोट झाला आहे .स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, या स्फोटमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून स्फोटात काही गाड्यांचे नुकसान झाले आहे , अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असला तरी सध्या दिल्लीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.