India

Uttar Pradesh: “विमानतळ, हेलीपोर्ट्स आणि वॉटर डोमचे नेटवर्क बनेल” उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचं वक्तव्य

Published by : Lokshahi News

उत्तर प्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. दिल्ली ते कुशीनगर साठी थेट विमानसेवा २६ नोव्हेंबरपासून सुरू होईल.

कुशीनगर आज जगाशी जोडलं गेलंय. 'सबका साथ सबका विकास' होतोय. या विमानतळामुळे केवळ पर्यटनाचाला प्रोत्साहन मिळेल असं नाही तर यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. सोबतच पशुपालक, छोटे व्यापारी यांनाही या विमानतळाचा फायदा होईल. रोजगारासाठी नव्या संधी निर्माण होतील, असा दावा यावेळी पंतप्रधानांनी केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवादही साधला. येत्या 3-4 वर्षात देशात 200 हून अधिक विमानतळ, हेलीपोर्ट्स आणि वॉटर डोमचं जाळं विणण्यात येईल. येत्या काही आठवड्यात स्पाईस जेट दिल्ली ते कुशीनगर दरम्यान विमान सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना त्याचा फायदाच होईल, असं मोदींनी सांगितलं.

कुशीनगरला दिल्ली, मुंबई, कोलकाताशी जोडणार

दिल्ली ते कुशीनगर साठी थेट विमानसेवा २६ नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी कुशीनगरला मुंबई आणि कोलकाताशी जोडलं जाईल, अशी माहिती या कार्यक्रमात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.

बौद्ध भिक्खूंसहीत श्रीलंकेतून दाखल झालं विमान

कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं श्रीलंकेच्या कोलंबोतून एक विमान नवीन विमानतळावर उतरवण्यात आलं. यामध्ये १०० हून अधिक बौद्ध भिक्खूंसहीत काही अधिकाऱ्यांचाही समावेश होता. उल्लेखनीय म्हणजे, कुशीनगर हे एक आंतरराष्ट्रीय बौद्ध तीर्थस्थळ म्हणून ओळखलं जातं. याच ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्याचं मानलं जातं.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती