Mumbai

अखेर 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना अटक

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक  (Nawab Malik)यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी ED) चौकशीसाठी कार्यालयात नेण्यात आलं होते. तब्बल आठ तासांचा चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरच्या जबाब्यात त्यांचे नाव आल्याने मलिकांची ईडीकडून चौकशी केली जात होती.गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका त्यांच्यांवर ठेवण्यात आला आहे.

नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेले गेले आहे.जेजे रुग्णालयात मेडिकल करण्यात येईल. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येईल. गुन्हेगारांकडून जमीन खरेदी केल्याचा ठपका नवाब मलिक यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=Osv0xzKmIQ4

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)कार्यकर्ते मोर्चा घेऊन ईडीच्या कार्यालयावर धडकले असून असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याठिकाणी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. 'ईडी'च्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

https://lokshahi.live/nawab-malik-arrest-know-low-from-ujjwal-nikam/

नवाब मलिक (Nawab Malik) यांना चौकशीसाठी ईडीच्या बॅलर्ड पिअर येथील कार्यालयात नेण्यात आले आहे. येथूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काही अंतरावरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp)कार्यकर्त्यांना याठिकाणी जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून यासंदर्भात भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. नवाब मलिक हे मंत्री आहेत. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व संकेत धुडकावून त्यांना ताब्यात घेतले. ही गंभीर गोष्ट असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

नवाब मलिक  (Nawab Malik) हे साधारण पावणेआठच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. तेव्हापासून तब्बल तीन तास उलटल्यानंतरही नवाब मलिक यांची चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने कुख्यात गुंड दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी इकबाल कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचप्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांकडून नवाब मलिक यांची चौकशी केली जात आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी