Mumbai

पोलिसांची मोठी कारवाई, २ कोटींचा चरस जप्त

Published by : Vikrant Shinde

मिनाक्षी म्हात्रे: मुंबईतील (mumbai)दहिसर पोलिसांनी (police) एका आरोपीला चरस प्रकरणात (charas) अटक केली आहे. विजय चौहान वय वर्ष (32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मुंबईतील मालवणी येथे राहतो. पोलिसांनी 1 कोटी 95 लाख 18 हजार किंमतीचा 6 किलो 560 ग्रॅम चरस (charas) या आरोपीकडून जप्त केला आहे.

पोलिसांनी दहिसर चेकनाक्यावर सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी यूपीच्या कानपूर इथून चरसचा व्यापार करण्यासाठी मुंबईत आला होता. आरोपीशी आणखी किती लोक संबंधित आहेत तसेच हा व्यक्ती कधीपासून चरसचा व्यवसाय करत होता, याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत.

आरोपी दहिसर चेक नाक्याजवळ चरस घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना सुत्रांकडून मिळाली होती. आरोपी ठरल्याप्रमाणे चरस घेऊन दहिसर चेक नाक्याजवळ आला असता पोलिसांनी करोडो रुपयांच्या चरससह आरोपीला रंगेहात पकडले. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. महिनाभरापूर्वी दहिसर परिसरातून दोन ड्रग्ज तस्करांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून 3 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला होता.

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे