देशात 'तोक्ते' वादळाच्या तडाख्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरु असताना आता यास या नव्या चक्रीवादळाचा धोका किनारी भागावर निर्माण झाली आहे. येत्या २६ मेच्या संध्याकाळी हे वादळ किनारी भागात धडकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये हवामानात होत असलेल्या बदलांमुळे परिस्थिती आधी वादळ आणि त्यात तीव्र बदल झाल्यास त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याचीही शक्यता आहे. समुद्रातील कमी दाबाचा पट्टा जर अधिक तीव्र झाला आणि त्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं, तर ते 'यास' म्हणून ओळखलं जाईल. वातावरणात योग्य ते बदल झाल्यास २६ मेच्या संध्याकाळी हे वादळ किनारी भागात धडकेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.