महाराष्ट्रातील सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला राज्य सरकारने परवानगी (wine sale in supermarket) दिली. या निर्णयावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. भाजपसह अनेकांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं. तर याच निर्णयावर ह. भ. प. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी नेत्यांवर टीका केली.
तसेच राज्य सरकारने (State Government) सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी साताऱ्यात 'दंडवत दंडुका' या आंदोलनाद्वारे विरोध दर्शवला होता. या प्रकरणी साताऱ्यात पोलिसांनी बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तसेच महिला नेत्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार आल्यानंतर त्यासंदर्भातही गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.