राज्यात कोरोना लसीकरणाची मोहिम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनाची लस टोचून घेतली.
उद्धव ठाकरे यांनी कोरोनाची लस घेण्यापूर्वी त्यांची प्राथमिक तपासणी केली गेली त्यानंतर त्यांना लस देण्यात आली. दरम्यान याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्चला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोनाची लस घेतली होती. त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोरोना लसीकरणे केले होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली होती. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते.
कोरोना लस टोचून घेणं बंधनकारक आहे का?
कोरोनाची लस टोचून घेणं बंधनकारक नाही. ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार कोरोनाची लस घेऊ शकता. कोणावरही लसीसाठी जबरदस्ती नाही. लस घेणं किंवा न घेणं ऐच्छिक असेल.