भारतात उत्पादन होणारी कोव्हॅक्सीन लस लहान मुलांना देण्यासाठी आपत्कालीन मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ही मंजुरी मिळाली तर देशात लहान मुलांना दिली जाणारी पहिली स्वदेशी लस भारताला उपलब्ध होईल.
भारत बायोटेकनं २ ते १८ वयोगटातील मुलांवरील चाचणीचा संपूर्ण अहवाल ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (DCGI) पाठवला आहे. चाचणीचा अहवाल समाधानकारक वाटला तर लवकरच कोव्हॅक्सीनला लहान मुलांवर वापरायला आपत्कालीन मंजुरी मिळेल.देशातील विविध ठिकाणी या लसीची लहान मुलांवर चाचणी घेतली होती. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वर्षांमधील मुलांवर, त्यानंतर ६ ते १२ वयोगट आणि सर्वात शेवटी २ ते ६ वयोगटातील मुलांवर लसीची चाचणी केली होती.
तसेच, भारत बायोटकनं डब्ल्यूएचओला (WHO) ९ जुलै रोजी कोव्हॅक्सीन लसीची सर्व माहिती दिली आहे. डब्ल्यूएचओकडून कोव्हॅक्सीनला मंजुरी मिळाली तर ही लस घेतलेल्या नागरिकांना क्वांराटइन नियमांचं पालन न करता परदेश यात्रा करता येईल.