योगगुरू बाबा रामदेव यांना दिल्ली हायकोर्टानं 'पतांजलि'च्या 'कोरोनिल' औषधाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीची माहिती दिल्याप्रकरणी समन्स धाडले आहेत. त्यामुळे बाबा रामदेव यांच्यासमोर आता नवा पेच निर्माण झाला आहे.
दिल्ली मेडिकल असोसिएशननं 'पतांजलि'कडून 'कोरोनिल' संदर्भात चुकीची माहिती देण्यापासून रोखण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीदरम्यान बाबा रामदेव यांच्या वकिलांना कोर्टानं याप्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत 'पतांजलि'नं 'कोरोनिल' संदर्भात सार्वजनिक पातळीवर कोणतंही भाष्य करू नये, असं सांगितलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १३ जुलै रोजी होणार आहे.