Crime

कुटूंबियांसमोरच विहिरीत उडी, प्रेमीयुगुलाने संपवली जीवनयात्रा; कारण एकुण थक्क व्हाल

Published by : left

कल्पना नळसकर, नागपूर | नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) एका प्रेमीयुगुलाने (Love couple) विहिरीत उडी देत आत्महत्या (Suicide) करत आपली जीवन यांत्रा संपवली आहे. विशेष म्हणजे हा संपुर्ण घटनाक्रम प्रेमीयुगुलाच्या कुटूंबियांच्या डोळ्या समोरच घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने नागपुरात हळहळ व्यक्त होत आहे.

नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) बेला जवळील 3 किलोमीटर अंतरावर कुर्ला शिवारात प्रेमीयुगलाने (Love couple) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली.बेला येथील मृतक मुलगा महेश शालिक ठाकरे वय 26 वर्षे तर मृतक तनव्ही विठ्ठल चुटे वय 16 वर्ष हे दोन वर्षापासून एकमेकांच्या प्रेमात होते. तन्वी  तिडके हायस्कूल येथे इयत्ता नववी मध्ये शिकत होती. 25 मार्चला घरच्यांना कुठलीही कल्पना न देता ती महेश सोबत पळून निघून गेली होती.

दोघांच्याही घरच्यांनी शोधाशोध सूरू केली होती. याप्रकरणी मुलीच्या घरच्यांना ती महेश नावाच्या मुलासोबत पळून गेल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे मुलीच्या कुटूंबियांनी बेला पोलीस स्टेशन (Bela Police Station) मध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी  कलम 363 गुन्हा नोंदवत, सर्व पोलिस स्टेशनला कळविले होते.

महेशच्या घरचेही त्याचा शोध घेत होते. 28 मार्चला शोधण्याकरिता बेला कुर्ला समुद्रपूर या रस्त्यांनी गेले असता त्यांना कुर्ला रस्त्यावर दोघेही दिसले. पण त्यांना पकडण्या आधीच त्यांनी कुर्ला येथील अक्षय जनार्दन कांबळे यांच्या शेतातील विहीरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच बेला पोलीस घटनास्थळी पोहचले. पण कुर्ला समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे समुद्रपूर पोलिसांनी कारवाई करीत सायंकाळी मृतदेह  बाहेर काढत पंचनामा केला.तसेच या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करीत मृतदेह उत्तर तपासणीकरिता वर्धा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result