राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकादा वाढला असून मुंबई, पुणेसह अन्य प्रमुख शहारांमध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्याही पुढे आहे.
आज दिवसभरात राज्यात ८ हजार ६७ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, आठ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.
ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –
आज राज्यात चार ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) रिपोर्ट केले आहेत. वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी एक रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळला आहे. आजपर्यंत राज्यात एकूण ४५४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १५७ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.