देशात कोरोनाचा कहर अद्यापही सुरु असून गेल्या २४ तासांत तब्बल २ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तसंच सलग दुसऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ९३ हजार ५२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
देशात गेल्या २४ तासात २ लाख ७३९ करोना रुग्ण आढळले असून ९३ हजार ५२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यासोबतच देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तसंच देशात सध्याच्या घडीला १४ लाख ७१ हजार ८७७ अॅक्टिव्ह रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार १२३ इतकी झाली आहे.