भारतामध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे 10,126 नवे रूग्ण; तर मागील 266 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या.
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान अनेकदा नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ देखील होत आहे देशभरात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून काही ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
भारतामध्ये मागील 24 तासांत कोरोनाचे 10,126 नवे रूग्ण , 332 जणांचा मृत्यू समोर आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिली आहे. ही मागील 266 दिवसांमधील निच्चांकी रूग्णसंख्या असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान तर अॅक्टीव्ह रूग्ण देखील मागील 263 दिवसांमधील निच्चांकी म्हणजेच 1,40,638 असल्याची माहिती देण्यात आली आहे