देशभरात कोरोनाच्या महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोनाबाधितांची संख्या ही वाढताना दिसून आली आहे.
शिवाय, कोरोनाबाधितांचे मृत्यूदेखील होत आहेत. एकीकडे कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलेले असता, दुसरीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचा संसर्गदेखील वाढत आहे.
देशभरामध्ये मागील २४ तासात २ लाख ६८ हजार ८३३ नवीन कोरोनाबाधित आढळले. ही संख्या काल आढळलेल्या कोरोना बाधितांपेक्षा ४ हजार ६३१ रूग्णांनी जास्त आहे. याशिवाय याच कालावधीत १ लाख २२ हजार ६८४ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत.