ब्रिटनमध्ये बुधवारी मागील 24 तासांमध्ये एक लाख सहा हजार 122 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने सरकारने नागरिकांना लशीचा तिसरा डोस म्हणजे बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले आहे.
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 30 दशलक्ष नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 37,101 बाधित आढळले आहेत. या दरम्यान, ब्रिटनने पाच ते 11 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी फायजरच्या लशीला मंजुरी दिली आहे.