देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) सोमवारी एक नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहेत. (ICMR latest guidelin on Covid-19 stated) कोविड चाचणी कोणाला करणे आवश्यक आहे आणि कोणाला नाही हे यामध्ये सांगितले आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच कोरोना चाचणी करण्याची गरज नाही. (COVID 19 PATIENTS NEED NOT BE TESTED ICMR) मात्र, कोरोनाची लागण (COVID 19 PATIENTS) झालेल्या व्यक्तीला गंभीर आजार असेल किंवा त्यांचे वय जास्त असेल आणि तुम्ही जर त्यांच्या संपर्कात आलेले असाल तर तुम्ही चाचणी करावी असही सांगण्यात आले आहे.
उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या विचारानुसार खालील पॅरामीटर्सच्या आधारे कोरोना चाचणी केली जाऊ शकते. शस्त्रक्रिया किंवा प्रसूतीसारख्या आपत्कालीन प्रक्रियांना केवळ टेस्ट झाली नाही म्हणून रुग्णालयांमध्ये भरती करण्यास उशीर होऊ नये. केवळ टेस्टिंगची सुविधा नसल्यामुळे कोणत्याही रुग्णाला इतर कोणत्याही वैद्यकीय केंद्रात पाठवू नये. टेस्ट सँपल गोळा करून ते केंद्रात पाठविण्याची संपूर्ण व्यवस्था असावी. अगदी आवश्यक नसल्यास किंवा लक्षणे दिसत नसलेले लोक जे रुग्णालयात दाखल आहेत, त्यांनी आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळा कोरोना चाचणी करू नये.
कोणाला टेस्ट करण्याची आवश्यकता नाही
4 .ज्या व्यक्तींना सुधारित डिस्चार्ज पॉलिसीच्या आधारे कोविड-19 केंद्रातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोणाला टेस्ट करण्याची आवश्यकता
ताप, खोकला, घसा खवखवणे, चव किंवा वास कमी होणे, श्वासोच्छवासात अडचण इ. लक्षणे दिसल्या.