कोरोना संक्रमणामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत देशातील रुग्णवाढ नव्या शिखरावर पोहोचली आहे. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासूनची ही उच्चांकी रुग्णवाढ असून, कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही २४ तासांत वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेली ही आकडेवारी सरकार आणि आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ आणि मृत्यूची संख्या जाहीर केली आहे. रविवारी नोंदवण्यात आली रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. २४ तासांत गेल्या 24 तासांत 1 लाख 61 हजार 736 कोरोना बाधित आढळून आले असून, याच कालावधीत देशात 879 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 97 हजार 168 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशातील एकूण मृतांची संख्याही 1 लाख 71 हजार 058 इतकी झाली असून, एकूण रुग्णसंख्या 1 कोटी 22 लाख 53 हजार 697 वर पोहोचली आहे.