Vidharbha

“डॉक्टरांकडे जाऊ नका, डॉक्टर हरामखोर, मारायचे लायकीचे आहेत”

Published by : Shweta Chavan-Zagade

सूरज दाहाट | अमरावती : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी अमरावती मध्ये देखील पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'कोरोनात 105 टक्के लोक भीतीनेच मेले. जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो गाढव. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर हरामखोर आहेत. डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका', असं वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे डॉक्टर संघटना आक्रमक होण्याची आणि नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संभाजी भिडे हे अमरावती मध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे हे सोमवारी राजापेठच्या उड्डाणपुलाचे नामकऱण करण्यासाठी अमरावती दौर्‍यावर होते. बोलता-बोलता ते थांबत चांंगलेच संतापले. त्या कार्यकर्त्याला खडसावत ते म्हणाले,  'ये कोरोना तोंडाच काढ मुचक, तु गांडू नाहीयेस..तोंडाला मुचके बांधणे गांडू पणाचे लक्षण आहे.

डॉक्टर काय ते सांगू दे…ते लोकांना लुटतात अशा डॉक्टरांना धरून हाणले पाहिजे..कोरोना हे थोतांड आहे..काहीही झाले तरी त्यांच्याकडे जावू नका असे वक्तव्य भिडे यांनी केले.तर आता संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर अमरावती सह राज्यभरात काय पडसाद उमटते ते पहावं लागेल मात्र संपूर्ण जग कोरोनाशी चार हात करत असतांना कोरोना व डॉक्टर बद्दल वादग्रस्त वक्तव्य निषेधार्थ आहे.

रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता

Latest Marathi News Updates live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देणार-सूत्र

Latest Marathi News Updates live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या राजीनामा देणार-सूत्र

Eknath Shinde Resign | मोठी बातमी, एकनाथ शिंदे देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा | Lokshahi