भूपेश बारंगे, वर्धा
देशात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील 'आप' करत आहेत. यांनी गलिच्छ राजकारण देखिल केले आहे. अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली आहे. या पक्षांनी अतर राज्यांतून आलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे कोरोनाचा हाहाकार झाला. याशिवाय त्यांनी काँग्रेसलं वर चांगलेच टीकास्त्र सोडलं होतं.
लाखो प्रवासी मजुरांचा विचार न करता जेव्हा पहिल्या कोरोनाच्या लाटेमध्ये मोदींजीनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता त्यावेळला कॉंग्रेस पक्षाने दिवसरात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि महाविकास आघाडीनी सगळ्या मजुरांची खाण्यापिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था त्यांच्या आरोग्याची व्यवस्था तर एवढंच नाही तर महिल्यांच्या आरोग्याची व्यवस्था केली होती.
मोदीजी म्हणतात की कॉंग्रेसमुळे कोरोना वाढला आम्ही त्यांना हे विचारू इच्छितो तुम्ही त्यावेळस जे करायला पाहिजे होते तेव्हा तुम्ही ते केलं नाही. मजुरांना परत पाठवण्याची व्यवस्था केली नाही. सोनियाजी व राहुलजी नी सगळ्या राज्याचा कार्यकर्त्यांना आव्हान केलं होतं की, या मजुरांची त्यांच्या त्यांच्या प्रांतामध्ये कशाप्रकारे पोहचवायचं त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्यासाठी ट्रेन बसेस उपलब्ध करून द्यायच्या आणि त्याप्रमाणे कॉंग्रेसपक्षाने ही सगळी मदत केली.
ते दुसऱ्यावर दोष घालतात हे आता सगळ्यांना माहीत झाले आहे. देश आणि जनता एवढी मूर्ख नाही आहे. कृतज्ञ नाही आहे म्हणून या आरोपाचा आम्ही खंडन करतो निषेध करतो. काँग्रेसच्या प्रवक्त्या चारुलता टोकस यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे.