गेल्या आठ दिवसापासून राज्यामध्ये विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन, मका, कपाशी, ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र 65 मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय अधिका-यांना पंचनाम्याचे आदेश दिले जात नाही तरीही मागील सात ते आठ दिवसात राज्यात 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रशासनाने तात्काळ पंचनाम्याचे करण्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पंचनाम्याची मागणी केली आहे