Crime

पंढरपूरच्या वारीहून परतताच केली आत्महत्या; दोन लहान मुलं झाली पोरकी

Published by : Lokshahi News

मयुरेश जाधव | अंबरनाथ | उल्हासनगरात पती पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीये. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून या दाम्पत्याची दोन मुलं मात्र या घटनेनं पोरकी झाली आहेत.

उल्हासनगरच्या कॅम्प १ भागातील राजीव गांधी नगर परिसरात सचिन आणि शर्वरी सुतार हे दाम्पत्य त्यांच्या ७ आणि ४ वर्षांच्या दोन मुलांसह राहत होते. सकाळच्या सुमारास या जोडप्यानं घरातच गळफास घेतल्याचं त्यांच्या मुलांनी पाहिलं आणि शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. सचिन सुतार हे सुतारकाम करायचे. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं, किंवा आर्थिक अडचणही नव्हती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. आत्महत्या करण्यापूर्वी सचिन सुतार हे पत्नी आणि मुलांसह कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाऊन आले. त्यानंतर शुक्रवारी ते शर्वरी यांच्या माहेरी चिपळूणला जाऊन आले, तर शनिवारी ते सचिन यांच्या वडिलांकडे डोंबिवलीला जाऊन आले. यानंतर शनिवारी रात्री मुलं झोपल्यानंतर त्यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. त्यामुळं आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊनच हे दाम्पत्य देवदर्शन आणि परिवाराला भेटण्यासाठी गेल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर त्यांची दोन लहान मुलं मात्र पोरकी झाली आहेत. या घटनेप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result