India

सीएनजी, पीएनजी दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या मुंबईत कितीने वाढल्या किमती

Published by : Lokshahi News

सीएनजी(CNG), पीएनजी (PNG) आणि एलपीजी (LPG) दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ (CNG-PNG Price Hike) झाली आहे. पाईपद्वारे घरोघरी पोहोचणाऱ्या एलपीजी आणि वाहन इंधन सीएनजीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीमध्ये कराचा समावेश आहे. हे नवे दर शनिवारी सकाळपासून म्हणजेच १८ डिसेंबर पासून लागू झाले आहेत. सीएनजी व्यतिरिक्त एलपीजी पीएनजीच्या दरातही प्रति किलो दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर आता मुंबईत नवीन दर ६३.५० रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्याच वेळी, मुंबईतील पाइप नॅचरल गॅसची सुधारित किंमत ३८ रुपये प्रति युनिटवर गेली आहे.मुंबई महानगर प्रदेशात गेल्या ११ महिन्यांत सीएनजीच्या किमतीत १६ रुपये प्रति किलोने वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम महानगरातील आठ लाख ग्राहकांवर झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल नाही

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आजही चार महानगरांमध्ये दोन्ही पारंपरिक इंधनांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिवाळीपासून दोन्ही इंधनांचे दर स्थिर आहेत. नवीन दरानुसार, दिल्लीत पेट्रोलचा दर ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर दराने विकला जात आहे. मुंबईत पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये, चेन्नईमध्ये पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये आणि कोलकातामध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लिटर आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा