India

CNG & PNG Price | आजपासून सीएनजी आणि पाईप गॅस महागला

Published by : Lokshahi News

आता पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही आजपासून वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी गॅसच्या किमतीत आजपासून वाढ होणार आहे.

महानगर गॅस लिमिटेड या इंधन पुरवठादार कंपनीने आज मध्यरात्रीपासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रती किलो 2 रुपये 58 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. याचा मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे.

असे असतील सीएनजी आणि पाईप गॅसचे दर

सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुलनेत सीएनजीचे दर स्वस्त आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 107.20 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 97.21 रुपये आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी 67 टक्क्यांनी स्वस्त आहे. तर डिझेलच्या तुलनेत सीएनजी 47 टक्क्यांनी स्वस्त आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या सीएनजी पाईप गॅस 35 टक्क्यांनी स्वस्त असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज वाढत आहेत. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली असून डिझेलचे दरही शंभरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीनंतर सीएनजी दरवाढीनंही सर्वसामान्यांचा खिसा हलका होणार आहे.

इंधन दरवाढीबाबत सरकारने आधीच हात वर केले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमतीमुळे होत असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result