भारतीय शेअर बाजारात तुफान विक्री होऊन मुख्य निर्देशांक सव्वा दोन टक्क्यांनी कोसळले. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,145 अंकांनी कोसळून 49,744 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्र राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 306 अंकांनी कोसळून 14,675 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी, टीसीएस या कंपन्याचे शेअर पडले असून, महिंद्रा, ऍक्सिस बॅंक, इंडसइंड बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही घट नोंदली गेली. या विक्रीच्या वादळात फक्त ओएनजीसी, एचडीएफसी बॅंक आणि कोटक बॅंकेच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.