संपूर्ण जगावरील कोरोनाचं संकट ओसरत असतानाच भारत हा जगातील सर्वाधिक वेगाने लसीकरण करणाऱ्या देशांपैकी एक ठरत असतानाच आरोग्य मंत्रालयाकडून लसीकरणासंदर्भात आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करुन 16 मार्चपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु होणार आहे अशी घोषणा केली आहे.यापूर्वी 15 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु होते आता 12 ते 13 आणि 13 ते 14 वयोगटातील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.
ट्वीटमध्ये काय म्हणाले मांडवीय?
"मुलं सुरक्षित असतील तर देश सुरक्षित!
मला कळविण्यात आनंद होत आहे की 16 मार्चपासून 12 ते 13 आणि 13 ते 14 वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण सुरू होत आहे. तसेच, 60+ वयोगटातील प्रत्येकजण आता सावधगिरीचे डोस घेण्यास सक्षम असेल. मी मुलांचे कुटुंब आणि 60+ वयोगटातील लोकांना विनंती करतो की त्यांनी लस अवश्य घ्यावी."