Mumbai

शिव जयंतीचा उत्साह : कुठे रांगोळी, कुठे तैलचित्र, मोदी म्हणाले…

Published by : Jitendra Zavar

छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj Jayanti)यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. कुठे रांगोळी, कुठे तैलचित्र तर कुठे कार्यक्रम घेतले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराज यांना वंदन करतानाचा एक फोटो देखील ट्विटवर पोस्ट केला आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj )

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांना वंदन करतानाचा एक फोटो शेअर करत म्हटलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो. त्यांचे अतुलनीय नेतृत्व आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेलं कार्य पिढ्यानपिढ्या लोकांना प्रेरणा देत आहे. सत्य आणि न्यायाच्या मूल्यांसाठी उभे राहण्याच्या बाबतीत ते ठाम होते. त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

विश्वविक्रमी तैलचित्र
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वविक्रमी तैलचित्र साकारण्यात आले आहे. हे जगातील सर्वात मोठे साडेअकरा हजार स्केअर फुट आकाराचे तैलचित्र आहे. हे तैलचित्र हे लातुरातील कलाकार मंगेश निपाणीकर यांनी साकारले आहे. त्यासाठी त्यांना १६ दिवस लागले आहेत. ४५० लिटर रंगाचा वापर करण्यात आला आहे.

मुंबईतील टॅक्सी भाड्यात ५० टक्के सूट
लालबाग मधील शिवभक्त टॅक्सीचालक संदिप कदम यांनी आज शिवजयंती च्या निमित्ताने सर्व प्रवाशांना मीटर भाड्यामध्ये ५० टक्के सूट देऊन आपल्या प्रती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेली आदराची भावना व्यक्त केली आहे . हे त्यांचे दुसरे वर्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुटूंबाने आर्थिक गणित कोलमडले असतानाही त्यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल समाजात त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
रोपांतून शिवप्रतिमा
कल्याण पूर्वेतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे या वर्षीच्या शिवजयंतीनिमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी प्रतिमा साकरण्यात आली आहे, शिवजयंतीनिमित्त सहा हजार रोपांच्या माध्यमातून शिवप्रतीमेची छबी साकारण्यात आली आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर; मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

Latest Marathi News Updates live: सरकार स्थापनेबाबत दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज चर्चा होणार

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड