education

शिखर कन्या प्रियंका मोहितेला केंद्र सरकारचा टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवार्ड जाहीर

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप | सातारा | अनेक पर्वत आणि शिखरे यशस्वीपणे सर करून "शिखरकन्या" प्रियंका मोहिते हिने नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.. आज तिला केंद्र सरकारचा टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवार्ड जाहीर झाला आहे.

ही सातारकरांसाठी अभिमानाची बाब असून प्रियांका मोहिते हिने आपल्या सातारचे नाव जागतिक स्तरावर उंचावली आहे असे गौरवोद्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले आहे. साताऱ्याची शिखर कन्या अशी ख्याती मिळवलेल्या प्रियांका मोहिते हिला केंद्र सरकारचा टेनझिंग नॉर्गे नॅशनल अडव्हेंचर अवार्ड जाहीर झाला आहे. अतिउच्च अन्नपूर्णा शिखर सर केल्यानंतर तिला पुरस्कार जाहीर झाला असून 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात तिचा सन्मान केला जाणार आहे. या यशाबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news