देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, अशी माहिती केंद्र सरकारने दिल्यानंतर वादाला फोडणी मिळाली आहे. त्यानंतर राज्याने आकडेवारी दिली नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलं होतं.
"ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अहवालात दिलेली नाही. आरोग्य हा राज्याचा विषय आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश रोज आकडे केंद्र सरकारला देत असतं. तीच आकडेवारी केंद्र सरकार देत असतं.", अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून जोरदार टीका करण्यात आली होती.
आता केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेल्या लोकांची आकडेवारी मागितली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.