IPL च्या 15 व्या हंगामाला आजपासून (26 March) सुरुवात होणार आहे. आजचा पहिला सामना कोलकाता (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई (Chennai Super kings) यांच्या दरम्यान होणार आहे. दरम्यान, हे दोनही संघ नव्या नेतृत्वासह मैदानात उतरणार आहेत. कोलकात्याची धुरा श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) असेल. तर, चेन्नईचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे असणार आहे. काहीच दिवसांपुर्वी पार पडलेल्या श्रीलंकेसोबतच्या मालिकेमध्ये दोनीही कर्णधारांनी उल्लेखनीय कामगिरी केली असल्याने ह्या हंगामामध्ये चाहत्यांचं या दोनही खेळाडूंचं विशेष लक्ष असणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरची चमकदार कामगिरी:
श्रीलंकेविरुद्ध खेळविण्यात आलेल्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरने सलग तीन अर्धशतकं केली. इतकंच नव्हे तर तिन्ही सामन्यात तो नाबाद राहिला होता. त्यानं पहिल्या सामन्यात नाबाद 57 दुसऱ्या सामन्यात 74, त्यानंतर अखेरच्या आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद 73 धावांची खेळी केली होती.या कामगिरीमुळं श्रेयस अय्यरनं सामनावीरासह मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला होता.
कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजाची उल्लेखनीय कामगिरी:
श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात रवींद्र जाडेजानं उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यानं या सामन्यात 175 धावांची दमदार खेळी करत भारताचा डाव सांभाळला होता. या कामगिरीसह रवींद्र जाडेजानं भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच विक्रम मोडीत काढला होता. कपिल देव यांनी फलंदाजीसाठी सातव्या क्रमांकावर येऊन 170 धावांची खेळी होती. आता हा विक्रम जाडेजाच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. त्यानं फलंदाजीसाठी सातव्या क्रमांकावर येऊन 175 धावांची खेळी केली होती.
त्यामुळे हे दोन्ही प्रतिभाशाली खेळाडू आपापल्या संघांसह एकमेकांना भिडताना पाहणं सर्व प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.