काम धंदा

टाटा टेक्नॉलॉजीची बाजारात धमाकेदार एंट्री! पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना लॉटरी

जवळपास दोन दशकांनंतर म्हणजे २० वर्षांनी, टाटा समूहाने त्यांची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ (IPO) आणला.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Tata Technologies IPO : देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योग समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाची कंपनी आज शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. जवळपास दोन दशकांनंतर म्हणजे २० वर्षांनी, टाटा समूहाने त्यांची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीचा आयपीओ (IPO) आणला. आज त्यांची शेअर बाजारात धमाकेदार एंट्री झाली आहे आणि टाटा टेक शेअर्सने NSE आणि BSE वर बंपर लिस्टिंगसह व्यवहार सुरू केला आहे. ही लिस्टिंग गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमतीला झाली असून मोठा फायदा झाला आहे.

टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स बीएसईवर १,१९९.९५ रुपयांवर लिस्ट झाले आहेत. टाटा टेक शेअर्स थेट 140 टक्के प्रीमियमसह लिस्ट आहेत. टाटा टेकच्या 500 रुपयांच्या इक्विटी शेअरच्या इश्यू किमतीच्या तुलनेत ही लिस्टींग मोठी आहे. गुंतवणूकदारांना प्रति शेअर 700 रुपयांचा थेट फायदा झाला आहे. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स आज प्रति शेअर १२०० रुपयांवर लिस्ट झाले आहेत. टाटा टेकचे शेअर्स अपेक्षेनुसार बंपर प्रीमियमवर बाजारात लिस्ट झाले असून पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे.

दरम्यान, टाटा टेकचा आयपीओ 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणूकदारांसाठी खुला होता. कंपनीने ३,०४२.५१ कोटी रुपयांचा आयपीओ बाजारात आणला होता ज्याला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रेकॉर्डनुसार कंपनीकडे ७३.५८ लाख अर्ज आले म्हणजे एकूणच कंपनीचा आयपीओ ६९.४३ पट सबस्क्राइब झाला आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...