राज्यात शासकीय भरती रखडलेली असताना आता राज्य सरकारनं कंत्राटी कामगारांच्या भरतीचा जीआर काढलाय. खासगी नोकर भरतीसाठी तब्बल नऊ कंपन्यांची नियुक्ती करण्यात आलीय. या नऊ एजन्सीज अभियंता ते शिपाई अशा 85 संवर्गातील पदांची भरती करणार आहे. बेरोजगारांची ही फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.