काम धंदा

India Post Recruitment: सरकारी नोकरी शोधताय? भारतीय डाक विभागात 'या' पदासाठी भरती प्रक्रिया चालू...

भारतीय डाक विभागाने ड्रायव्हर (चालक) या पदासाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे.

Published by : Sakshi Patil

अनेक तरूण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. नोकरी मिळवण्यासाठी कायम प्रयत्नात असतात. अशाच तरूणांसाठी नोकरी करण्याची संधी आहे. फक्त दहावी पास असणाऱ्या तरुणांना देखील ही सरकारी नोकर मिळू शकते. भारतीय डाक विभागात (India Post Department) नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.

भारतीय डाक विभागाने ड्रायव्हर (चालक) या पदासाठी भरती प्रक्रिया चालू केली आहे. या पदासाठी अर्ज करायचा असल्यास भारतीय डाक विभागाच्या indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा लागेल. या नोकरीसाठी तुम्ही 16 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. एकूण 27 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

वयाची अट काय?

या जागेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 27 असणे गरजेचे आहे.

पगार काय मिळणार?

तुमची निवड झाल्यास तुमचा पगार 19900 ते 83200 रुपया एवढा असू शकतो.

शिक्षणाची अट काय?

ड्रायव्हर पदासाठी चालू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी फक्त 10 पर्यंतचे शिक्षण झालेले असावे.

या भरतीप्रक्रियेत अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी