काम धंदा

BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करु इच्छनाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

Published by : shweta walge

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करु इच्छनाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR) या पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. रस्ताही पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ आहे.

पदाचे नाव आणि तपशील:

पदाचे नाव - कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR)

पदसंख्या - एकूण २५ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण - मुंबई

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावी.

अर्ज करण्याची पद्धत- या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करत आहे त्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे. कायदा अधिकारी, विधी विभाग, तिसरा मजला, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१

अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous

कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR) या पदासाठी सर्वोच्च न्यायालयात १० वर्षे आणि त्याहून अधिक काळ वकील म्हणून काम केलेले असावे. किमान ५ वर्षांची AOR म्हणून नोंदणी झालेली असावी.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका